महाराष्ट्र मुंबई

“भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही”

मुंबई | महाराष्ट्रातल्या विरोधीपक्षाचं, म्हणजे भाजपचं सरकार लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, तिकडे संकट गंभीर आहे. तिथे जाऊन ते राज्य निर्माण करु शकतात, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आमच्यात कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधीपक्षाचं नशीबच फुटेल, असा टोमणाही संजय राऊत यांनी भाजपला मारलाय. शरद पवार राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

रोनाचा काळ वेदनेचा आहे, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं आहे, हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुख्यमंत्री चांगलं काम करतायेत; राज्यपालांचा पवारांजवळ निरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या