मुंबई | केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’चा (Agnipath Scheme) मुद्दा सध्या देशभर गाजत आहे. केंद्राच्या या योजनेला देशातील अनेक भागातून कडाडून विरोध करण्यात येत आहे. केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.
हा भारतीय सैन्यदलाचा अपमान असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. उत्तर भारतात मोदी सरकारच्या या योजनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना संजय राऊतांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.
सैन्यात एक शिस्त असते. मात्र, सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती होणार. त्यामुळे हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. आधी अच्छे दीनचे स्वप्न दाखवले आणि आता काय तर अग्निपथ काढले आहे. भारतीय सैन्याची प्रतिष्ठा आहे ती रसातळाला जाईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मित्रांपासून दूर राहा, आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीये”
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘काम हवं असेल तर या लोकांबरोबर चार दिवस रहावं लागेल’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
हॉटेल मालकाने अडवल्यानंतर सदाभाऊ खोत संतापले; राष्ट्रवादीला दिला गंभीर इशारा
Comments are closed.