मुंबई | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह (BJP) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून ओवैसी (Owaisi) यांना मुस्लिम मतं कापण्यासाठी मैदानात उतरवलं जातं. त्याचप्रमाणे काही हिंदू ओवैसी शिवसेनेच्या विरूद्ध वापरण्याचं कट कारस्थानाचं षडयंत्र भाजपकडून करण्यात येत आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
मराठी माणूस आणि हिंदू समाज शिवसेनेच्या (Shivsena) पाठिशी ठामपणे उभा आहे. भाजपचं ओवैसी षडयंत्र त्यांच्यावरच उलटेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. हिंदू ओवैसी कोण आहे हे देश जाणतो, असा अप्रत्यक्ष टोलाही राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, असदुद्दीन ओवैसींना देश जाणतो, मुस्लिम समाज ओळखू लागला आहे. त्याप्रमाणे आता हिंदू ओवैसींना हिंदू समाज हळूहळू ओळखायला लागला आहे, अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड
2 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”
“काय शोकांतिका आहे, नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात”
Comments are closed.