बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांकडून जीवे मारण्याची धमकी, नवनीत राणांची पोलिसांत तक्रार

मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरुन राज्यात सध्या जोरदार गोंधळ उडाला आहे. राणा दाम्पत्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. अशातच आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात नागपूर पोलिसात तक्रार केली आहे.

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आणि एॅट्रॉसिटी अंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली. यामुळे आता वातावरण आणखीनच गरम झालं आहे.

संजय राऊत यांच्यावर 153(A),294,506 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करु नका, 20 फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्प्ष्टीकरण, म्हणाल्या…

‘….तर राणा दाम्पत्यांवर कारवाई होणार’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, पाहा व्हिडीओ

“जो नडला त्याला फोडला, मोदी असते तरीही कार अशीच फोडली असती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More