Top News आरोग्य राजकारण

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणारे.

यापूर्वी 2019 नोव्हेंबरमध्ये राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गेल्या वर्षी अँजिओप्लास्टी दरम्यान हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या.

डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनी राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी केली होती.

शनिवारी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांनी हेल्थ चेकअप केलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवतोय. यासाठी राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन उद्या त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणारे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या