Top News विधानसभा निवडणूक 2019

बाळासाहेबांचा ठाकरी बाणा संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये; म्हणतात…

मुंबई |   महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका धडाडीने मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आजही ट्वीटच्या माध्यमातून भाजपला टोला लगावला आहे. आजच्या त्यांच्या ट्वीटमधून बाळासाहेबांचा ठाकरी बाणा  दिसत आहे.

बन्दे है हम उसके… हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो और, असं ट्वीट करत त्यांनी आम्हाला कुणाची भिती नाही असं भाजपला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत नित्यनियमाने सकाळी सकाळी एक ट्विट करत आहेत. ते ट्विटद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. तसेच ते विरोधकांना संदेश देत आहेत.

दरम्यान, सत्तासंघर्षाच्या पेचात शिवसेनेकडून सर्वाधिक चर्चेत राहिले ते संजय राऊत. त्यांनी अश्या काही भाजपवर तोफा डागल्या की भाजप हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. रूग्णालयातून देखील त्यांनी सामनाचा अग्रलेख लिहून भाजपवर टीकेचे बाण सोडले. तसंच रूग्णालयाच्या बेडवरून देखील ट्वीट करून मह जितेंगे, असा निर्धार बोलून दाखवला.

 

 

काँग्रेस शिवसेनेचं नातं किती जुनं आहे ते पाहा…!

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या