Top News विधानसभा निवडणूक 2019

संजय राऊतांची ट्विट मालिका थांबेना; भाजपवर पुन्हा केला वार

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्विट सत्र नित्यक्रमाने सुरुच आहे. त्यांनी सकाळी सकाळी एक ट्विट केलं आहे. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली असल्याचं दिसतंय.

हवा को गुमान था…अपनी आज़ादी पर…किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया ! …..जय महाराष्ट्र, असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राऊत भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

संजय राऊत यांनी सामना अग्रलेख, पत्रकार परिषद आणि दररोज ट्विट करत भापली भूमिका जोरकरपणे मांडतानाच भाजपवर जोरदार हल्ले सुरु ठेवले होते. त्यांनी पत्रकार परिषदा घेणं बंद केलं असलं तरी दररोज ट्विट करण्याचं त्यांनी सोडलेलं नाही.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मोट बांधण्यात राऊतांनी पुढाकार घेतला होता.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या