बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं असून सध्या शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत राठोडांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचा एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये, ‘महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन’, अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे. यामधुन संजय राठोड यांना स्पष्ट संकेत दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवारी औरंगाबाद येथे बोलत असतानाही संजय राउत यांनी या प्रकरणावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी असल्याचं सांगितलं होतं. तसेच ते कोणालाही पाठीशी घालणार नाहीत व कोणावरही अन्याय हाेऊ देणार नाहीत असंही ते यावेळी बोलले होते. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे त्याआधी संजय राठोड यांची महाराष्ट्राच्या मंत्रीमंंडळातुन गच्छंती होण्याची शक्यता वाढली आहे.

विरोधकांनी या प्रकरणाला चांगलंच धारेवर धरलं असून संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन होऊ देणार नाही असं सरकारला खडसावुन सांगितलं आहे. आता सरकार यावर नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटमुळे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More