“कौन राहुल? ये है राहुल!”; संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत मोदींना डिवचलं

Sanjay Raut | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. त्यांनी नुकतच एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. “हा हा हा हा… कौन राहुल? ये है राहुल!, येही है राहुल !”, असं ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक फोटो शेअर केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. त्या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

ओम बिर्ला यांनी राहुल गांधींचं अभिनंदन करानाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट केला आहे. राहुल गांधीवर केल्या जाणाऱ्या भाजपच्या टीकेवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिश्कील टोला लगावला आहे. नुकत्याच 18 व्या लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. काल आणि परवा लोकसभा निवडणुकीच्या खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे कोडीकुन्निल सुरेश यांच्यात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली. या निवडीवेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं आहे. तो फोटो संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

संजय राऊत यांचं ट्विट

ओम बिर्लांबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना ओम बिर्ला यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ओम बिर्ला यांनी एका झटक्यात 100 खासदारांना निलंबित केलं होतं, हे आणीबाणीच्या काळात देखील झालं नव्हतं. लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आमची चर्चा सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी लोकसभेच्या विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्याने संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी राहुल गांधींचं अभिनंदन केलं आहे. “धन्यवाद राहुलजी…! तुम्ही या संविधानिक पदाचा स्विकार केलात. देशाला मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंत. आपण सर्वजण एकत्र लढूयात आणि जिंकूयात”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

News Title – Sanjay Raut Tweet Rahul Gandhi Photo With Om Birla

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?