बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”

मुंबई |  केंद्रात दुसऱ्यांदा भाजपप्रणीत एनडीएची सत्ता आल्याने राम मंदिराच्या मागणीला पुन्हा जोर चढला आहे. शिवसेनेने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राम मंदिर प्रकरणी भाजपला सवाल विचारला आहे. भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार आहेत. तर मग राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

15 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या 18 खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांआधीही शिवसेना पक्षप्रमुख अयोध्येला गेले होते. आता भाजपसोबत एकत्र लढल्यानंतर ते पुन्हा एकदा अयोध्यावारी करणार आहे.

दरम्यान, शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्याबाबत आग्रही आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-सार्वजनिक बँकांना बुडवण्यात भाजप नेते पु़ढे; ‘या’ नेत्यावर काँग्रेसने केला आरोप

-एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी; कारभार पारदर्शी नसल्याचा लोकयुक्तांचा ठपका

-नव्याचे नऊ दिवस असतात; अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांना टोला

-छत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; महाराष्ट्रभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

-खासदार उदयनराजे भोसले राज्याभिषेकादिनी महाराजांच्या चरणी नतमस्तक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More