मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) स्थापनेपूर्वी 2019 साली शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत गुढ अर्थ असलेल्या आणि सूचक शेरोशायरी करत असायचे. त्यांचे ट्विट नेहमी चर्चेत असायचे. आता पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण हिंदकळत असताना तशाचप्रकारचे ट्विट केले आहे. संजय राऊत हे आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि शिवराळ भाषेच्या सवयींमुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
एकनाथ शिंदे गटाच्या नाराजी आणि बंडामागे संजय राऊत हे एक नाव आहेच. तसेच शिंदे गटाच्या कित्येक आमदारांनी राऊत आमच्या मतांवर निवडून राज्यसभेत गेले आहेत, असेही म्हटले. बंड झाल्या दिवसापासून राऊत शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांचा पत्रकार परिषदा, मेळावे आणि सभांमध्ये समाचार घेत आले आहेत. आता त्यांनी एक ट्विट केले असून ते ट्विट त्यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टॅग केले आहे.
“अब नही कोई बात खतरे की, सभी को सभीसे खतरा है” हा जौन एलियाचा (Jaun Elea) शेर संजय राऊतांनी ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे. राऊत आपल्या ट्विट मधून काही राजकीय उलथापालथीचे संकेत तर देत नाही आहेत ना?, अशा चर्चा आता रंगत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राऊतांनी या नव्या शिंदे सरकारला हे सरकार बेकादेशीर आहे असे म्हटले आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणूकांची तयारी ठेवा असे सुद्धा सांगितले आहे. न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनाचा खटला न्यायप्रविष्ठ आहे तोवर या सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे राऊतांनी म्हटले होते.
थोडक्यात बातम्या –
‘हजारो रुपयांची दाढी कटींग करून पैश्यांच्या जोरावर आलेलं हे सरकार’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही?, नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक
‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Comments are closed.