बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद आहे, असं म्हणत प्रत्येकाने या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केले आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रीपुत्रास तर अटक केलीच नाही, अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी म्हणत राऊतांनी योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लखीमपूरमधील खीरी येथील हत्येचा साधा निषेध केंद्रातील मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं राऊत सामनातून म्हणाले.

पंतप्रधान, गृहमंत्री, कृषीमंत्री यांना साध्या संवेदनाही व्यक्त करू नये, म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारला आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण करावे, असं आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आजच्या महाराष्ट्र बंदला ‘या’ संघटनांचा असणार सक्रिय पाठिंबा

आज महाराष्ट्र बंदची हाक! कोणत्या सेवांवर होणार परिणाम?, वाचा सविस्तर

‘गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; नवाब मलिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

“केवळ आश्वासनाचे डोंगर उभा करून ठेवलेत, मदत म्हणून फुटकी कवडी सुद्धा दिली नाही”

‘आधुनिक महिलांना नको असतं मुल’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More