बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

नवी दिल्ली | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचं वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झो़ड उठवली आहे. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपला इशारा दिला आहे.

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल, कुणाला झटका आला असेल तर हिंमत असेल तर समोर या. पण स्वत:च्या पायावर याल आणि खांद्यावर जावं लागेल, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केलीये. तसेच भाजप आमदारांना देखील दम भरला आहे.

महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असं कोणतंच वक्तव्य करणार नाहीत. मूळ भाजपचे लोक असं वक्तव्य कधीच करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

सत्ता गेल्याने बाटग्यांना झटके येत आहेत. सत्ता भोगायला मिळेल म्हणून त्या पक्षात गेले. पण सत्ता न आल्याने भ्रनिरास झाला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकं उद्योग करत आहेत. भाजप सारख्या एका जुन्या पक्षाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असंही राऊतांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More