बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोख’मधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकारला देखील इशारा दिला आहे. पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत, असं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय.

एखाद्या खोटय़ा प्रकरणाचा डोलारा उभा करायचा आणि त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे. पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडलं. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळं केलं असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं, त्याचं समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळं केलं असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळं केलं आणि हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?, असा सवाल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचं वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखंच होतं, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केलं जातं, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

स्टंट करत गाडीवरच सुरू झाला रोमान्स अन्…, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या तरूणाने वाझेंबाबत केला खळबळजनक दावा!

13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More