बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”

मुंबई | एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून अकबरूद्दीन ओवैसींसह एमआयएमला (MIM) फैलावर घेतलं आहे. औरंगजेबाला याच मातीत गाडलं. आता त्याच्या भक्तांनाही कबरीत पाठवू अशा शब्दात संजय राऊतांनी ओवैसींना सुनावलं आहे.

ज्या औरंगजेबाच्या कबरीपुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनीच टाकलं आहे. कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, अकबरूद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं हा काही रितिरिवाज नाही. वारंवार संभाजीनगरमध्ये यायचं आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढं गुडघे टेकायचे, अशी टीका राऊतांनी केली आहे. तर यामधून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं ओवीसी बंधूंचं राजकारण असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले

‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं

किम जोंग उनच्या उत्तर कोरियात कोरोनाचा विस्फोट; धक्कादायक आकडेवारी समोर

सावधान! लहान मुलांवर घोंगावतंय टोमॅटो फ्लूचं सावट, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू

…अन् सेहवागने बीसीसीआयला फटकारलं; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More