बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

मुंबई | अनेक गोष्टींमुळे राज्यातील वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. शनिवारी रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. तुम्ही जर आमच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे. हजारो लाखो शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.

आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. लावा राजवट. माझं आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवट, सीबीआय (CBI), ईडी (ED) आम्ही यापलिकडे गेलोय. सत्तेची पर्वा आम्हाला नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना हीच एक पॉवर आहे. तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यापूर्वी लोकांनी घेतलाय. जे होतंय ते होऊन जाऊदेत. एकदाच होईल, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच

“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी”; नवनीत राणांची जहरी टीका

राज्याच्या राजकारणात खळबळ! शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

“शिवसेनेनं बेईमानी केली नसती तर…”; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More