बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

मुंबई | चीन-पाकड्यांचा हैदोस! हिंदुस्थान काय करणार? असा परखड सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. पाकिस्तान काश्मिरमध्ये जे उपद्व्याप करत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असा इशाराही सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडाका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारलं जात आहे. मोदींचे सरकार असताना काश्मिरातून हिंदुंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही, असा घणाघातही सामनातून करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाईट केले? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान शिरजोर झाला आणि काश्मिरमधील हिंसाचार वाढला असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. हे घुसखोरी करत आहेत व आपण चर्चेच्या फेऱ्या मोजत बसलो असल्याची टीकाही आजच्या सामनातून करण्यात आली आहे. देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही बलिदानच देत आहेत, अशी टीकाही सामनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More