बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

BREAKING | संजय राऊतांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी बोलावलं

मुंबई | शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले आहे. त्यांना उद्या 28 जूनला सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात सर्व कागदपत्रांसह हजर रहाण्यास सांगितलं आहे. यापुर्वी ईडीने त्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याअगोदर संजय राऊत यांचा अलिबागमधील फ्लॉट आणि दादरमधील फ्लॉट जप्त केला. होता. ईडीने याव्यतिरीक्त राऊत याच्या पत्नीचीही चौकशी केली होती.

संजय राऊत यांची यापुर्वी 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांची आहे. तर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्य़ा पत्नी वर्षा राऊत यांच्या मालकीची आहे. ईडीच्या कारवाईवर राऊत म्हणाले, संपत्ती जप्त झाली किंवा गोळ्या झाडल्या तरी या प्रकरणाला मी घाबरत नाही. राऊत यांनी ही कारवाई सुडाची कारवाई असल्याचे म्हंटले होते.

आजच्या ईडीच्या समन्सवर संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये “मला आता समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. येऊन मला अटक करा.” म्हंटले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या –

शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर

आम्ही पाठिंबा काढून घेतोय सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा एकनाख शिंदे

शिंदे गटाला मोठा धक्का?, वकिलांनी दिला गंभीर इशारा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

“मी कुठेही गेलो नाही, मला मंत्रीपदाची हाव नाही, शिवसैनिक हेच आमच्यासाठी मोठं पद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More