शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर, ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुंबई | राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जागांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून शिवसेनेच्या (Shivsena) हालचालींना वेग आला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार आहेत. शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जात संजय राऊत नवा विक्रम घडविण्याच्या तयारीत आहेत.
संजय राऊत 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेने आधीच दोन जागांवर दावा केला असून एका जागेसाठी संजय राऊतांचं नाव निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या जागेसाठी उमेदवाराची शोध अद्यापही सुरू आहे.
दरम्यान, शिवसेनेने दोन जागांवर दावा केल्यानंतर संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली. यानंतर सहा जागांसाठीची चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजप देशातील नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष”
‘तुम्ही म्हणाल तेव्हा जय श्री राम म्हणायला मी काही…’, सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
मोठी बातमी! सचिन वाझेंना न्यायालयाचा दणका
‘अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद…’; राष्ट्रवादीची मनसेवर खोचक शब्दात टीका
‘अयोध्येत जाऊ तेव्हा संजय राऊतांना सोबत घेऊन जाऊ’; मनसेनं डिवचलं
Comments are closed.