महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत!

मुंबई | शिवसेना दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं कळतंय.

मी सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणं गरजेचं असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर असल्याचं म्हणाले. मग पंतप्रधान मोदी यांनीच पुढाकार घेऊन शेतकरी नेत्यांना फोन करावा, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, सगळे डिटेल्स देतो’; अण्णांचा शिवसेनेला इशारा

सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण!

“2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?”

“मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये”

‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या