बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना काँग्रेसचा हात धरणार का?; संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

नवी दिल्ली | 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झालं. त्यावेळी शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. आता शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातयं. शिवसेना (ShivSena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस सरचिटणिस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुढील वर्षात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa), मणिपूर (Manipur) आणि पंजाब (Punjab) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना निर्णायक टप्पावर पोहोचली आहे. यावेळी युपीएमध्ये स्थान मिळवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. संजय राऊत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी घेत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावेळी युपीएवर सडकून टीका केली होती. त्यांनी युपीएचं अस्तित्वचं नाकारलं होतं. ‘अरे काय युपीए आता युपीए नाही’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे, असं म्हटलं होतं.

दरम्यान, शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या हालचाली वाढल्या आहेत. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनी युपीेेएचं समर्थन करत काँग्रेसशिवाय नवी आघाडी शक्य नसल्याचं म्हटलं होतं. आता शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाल्यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आनंद दवे हा डॅंबिस माणूस, त्यांनी…”, शरद पोंक्षेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

“आईचे दूध पिलेले असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा”

“सावरकरांना वैज्ञानिक दृष्टीकोन होता, भाजपने विनाकारण…”

“एक बाई उठते अन् तिला…”, बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More