गुजरात निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते हार्दीक पटेल यांनी आज मतदान केलं.

आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तीन महत्त्वाच्या पक्षांमध्ये गुजरातमधील लढत होतेय. दिल्ली, पंजाबनंतर थेट नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये आपने मोठा जोर लावलाय. त्यामुळे यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केलीये.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल की नाही, हे मी आताच सांगत नाही, लोक मशीन्सबाबत संशय व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते, लोकशाही अजूनही टिकून आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची दुसरी टर्म आहे. तरीही गुजरात विधानसभा निवडण्यासाठी पंतप्रधानांना फार मोठी बाजी लावायला लागली, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-