मुंबई | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. संजय राऊत आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत आहेत. तर यावेळी भ्रष्टाचारी भाजप नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेपुर्वी संजय राऊतांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहिलं असल्याचा खुलासा केला आहे. ईडीसंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 13 पानांचे पुराव्यासह पत्र दिले आहे. अनेक पत्रकारांनी ते पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवण्याची मागणी केली. ते मी आज देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात, राजकीय विरोधकांची कोंडी करून, अडचणीत आणून भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात हे सगळं पत्रात आहे. हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज पहिला भाग बाहेर काढत आहे, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, जे सत्य आहे त्याला टार्गेट म्हणू नका. काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि त्याचवेळी मोठे घोटाळे करून नामानिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फाडले पाहिजेत. समोरच्या काही प्रमुख लोकांचे भ्रष्टाचार समोर आणले जातील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या, अशा लोकांना झटका देणारी बातमी
उत्तराखंडात आप ठरणार किंग मेकर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
‘…तरच युद्ध थांबेल’; रशियाच्या या नव्या चार अटींनी युक्रेनचं टेंशन वाढलं
“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”
पुढील 3 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Comments are closed.