संजय राऊतांचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न तापला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना याच मुद्द्यावरून न्यायालयानं  2018 च्या प्रकरणात समन्स पाठवलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली  जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केलाय.

संजय राऊतांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचं राऊत म्हणालेत.

महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. पण बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट रचला जात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. बेळगावात सीमा प्रश्नावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स पाठवलं आहे.

एक डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे एक डिसेंबरला न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More