बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्रिपद वाटण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही ही कमिटमेंट आहे, असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही वाटा नाही, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार आहे अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणी आपण संस्कारी आहेत, इथं शत्रुत्व टोकाचं नसतं, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील. इथं वाटाघाटी नसल्याचं राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, 2024 ला नरेंद्र मोदीच येणार ही भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात. विरोधी पक्ष एकत्र आला तर लढाई होईल. भविष्यात काय होणार नाही माहीत नाही. कोणाला राजकारण मुठीत ठेवता येणार नाही. प्रशांत किशोर अनेक जणांना भेटले, त्यांची स्वतंत्र यंत्रणा असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

भारतातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

10वी नापास रिक्षाचालकाची अजब प्रेम कहाणी, आता राहतो स्वीत्झर्लंडमध्ये

‘या’ शहरातील लग्नावरील निर्बंध उद्यापासून हटणार; हॉटेलही पूर्ण क्षमतेने होणार सुरू

आयफोनमधून झाले तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक, अ‌ॅपल कंपनी देणार करोडोंची भरपाई

“वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More