बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बीकेसीत जाहीर सभा घेणार आहेत. सध्या अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं असताना उद्धव ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एवढी मोठी सभा घेणार आहेत. सर्वच पक्षातील नेते उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी वेगवेगळी प्रतिक्रिया देत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ही सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. आजची सभा ही क्रांतिकारी सभा असेल. आतापर्यंतच्या शंभर सभांचा बाप अशी ही सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे सभेत कुणावर निशाणा साधणार? काय बोलणार? राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अनेक चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ

“बूस्टर डोस नाही पण आमचा प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो”

“उद्धवजी, हिंमत करा आणि टोमण्या पलीकडची कृती आज कराच”

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More