बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहा-शरद पवारांच्या कथित भेटीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील अनेक प्रकरणांमुळे राज्य सरकारची गोची झाली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीमुळे अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. राष्ट्रवादीने याबाबत वृत्त फेटाळलं आहे. यावर शिवसेनेचे नेेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. तर काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे नाहीतर भ्रम निर्माण होतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मी विश्वासाने सांगू शकतो की शरद पवार आणि अमित शहा यांच्यात अहमदाबाद किंवा कुठही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी अफवा संपवा याने हाती काहीच लागणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या भेटीवर अमित शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

दरम्यान, सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत. आता महाराष्ट्राकडे आमचं लक्ष आहे. कोणासोबत सरकार बनवणार ते भविष्यात कळेल, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

‘बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटलांचा मोदींना टोला

वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं तेव्हाच सांगितलं होतं की…- संजय राऊत

सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?-नारायण राणे

रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More