‘पुरावा असेल तर…’; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान
मुंबई | सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली असूून शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सचिन वाझे हे शिवसेनेेचे वसुली एजंट असल्याची बोचरी टीका केली आहे. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.
सचिन वाझे यांचे शिवसेनेशी घनिष्ठ संबंध होते तर निलंबित असतानाही वाझे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून वावरत होते. सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यातून बिझनेस रिलेशन तयार झालं आणि त्यावेळी त्यांनी नेत्यांसोबत मिळून कंपन्या तयार केल्या. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेने वाझेंना कामावर परत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला असल्याचा गौप्यस्फोट करत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गंभार आरोप केले. मात्र राऊतांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नावं घेऊन बोला तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दबावातून करण्यात आल्या असं विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते खोटं आहे. ठाकरे सरकारवर कोणताही दबाव नाही. ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे बदल्या करण्यात आल्या असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सध्या ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आणि मीडियात रोज काही ना काही येत आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यावर शंका आहे त्यांची चौकशी होईपर्यंत बदल्या कराव्यात असं मुख्यमंत्र्यांना वाटलं म्हणून त्यांनी या बदल्या केल्या असंही राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 2 हजार पार!
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- नारायण राणे
‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप
महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल
भारताचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Comments are closed.