बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपांबाबत आज हायकोर्टानं याप्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

संजय राऊत यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. या सरकारमुळे त्यांना आता सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही अशी अवस्था झाली आहेे. याआधीही सरकारचा बचाव करण्यासाठी काहीच मुद्दे त्यांच्याजवळ नसतात तेव्हा ते सरकारशी संबंध नसल्याची विधानं करतात आणि स्वत:ला बाजूला ठेवतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

हायकोर्टानं दिलेल्या निकालानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासण्याचं काम केलं आहे, असा जोरदार घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, हायकोर्टानं दिलेल्या ‘सीबीआय’ चौकशीच्या निर्णयाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. राज्य सरकार कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन प्रतिक्रिया देईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या –

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More