बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

मुंबई | सरकार पडणार अशा पुड्या भाजप सोडत असतं पण याची गरज काय? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी चौफेर मुद्द्यांवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भाजपला थेट ऑफर दिली आहे.

आम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत असताना खूप विरोधी पक्षनेते पाहिले. तेव्हा वाटायचं की मंत्री, मुख्यमंत्री होण्यापेक्षा विरोधी पक्षनेता व्हावं. भाजपला सुदैवानं हे सगळं मिळालं आहे तर भाजपने आता राज्यावर आमच्यासोबत रूल केलं पाहिजे, अशी थेट ऑफर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, संसदीय लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्षाचं खूप महत्त्वाचं स्थान असतं. विरोधी पक्षनेता (Opposition Leader) हा शॅडो चीफ मिनिस्टर असतो आणि भाजप तेवढा ताकदीचा विरोधीपक्ष आहे. तर फालतू चिखलफेक करता, धुरळा उडवता हे तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नसल्याचा टोलाही संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून भाजप सुद्धा राज्यावर रूल करू शकतो, असं वक्तव्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) भाजपच्या विधायक कामांचा नक्कीच आदर करतील, असं प्रतिपादनही संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut’s Direct Offer To BJP)

थोडक्यात बातम्या-

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More