“संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, सगळी कुंडली बाहेर काढीन”
मुंबई | काल पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर काही गंभीर आरोप केले होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत आता पुर्ण राष्ट्रवादीचे आहेत. संजय राऊत लोकप्रभातला असताना उद्धव आणि बाळासाहेब यांच्यावर टीका करण्याचं सोडलं नव्हतं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे.
‘आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने. तू पत्रकार नाहीच, संपादक नाहीचं, तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो, हा काल अस्वस्थ का झाला? हा काल इतका बेजबाबदार का बोलत होता?, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला’, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना वाढवण्यासाठी नाहीये, उद्धव ठाकरे जिथे बसलेत ना तिथे आहे. हा अर्धा राष्ट्रवादीचा नाही तर पुर्ण राष्ट्रवादीचा आहे. जेव्हा उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले तेव्हा संजय राऊतचं होते, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. केलेल्या केसेसबद्दल आणि झालेल्या व्यवहाराबद्दल मला सगळं माहिती आहे. तुझी कुंडली माझ्याकडे आहे. सगळी बाहेर काढून टाकीन, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजींना एकच सांगू इच्छितोे की, संजय राऊत तुम्हाला घेऊन एकदिवशी नक्कीच डूबणार”
एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…
पॅन कार्ड हरवताच केवीन पीटरसनची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव, म्हणाला…
‘या’ कारणामुळे बप्पी लाहिरी घालायचे सोन्याचे दागिने!
‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा
Comments are closed.