बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनंत गीतेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. सध्या त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. त्यावर आता अनंत गीते यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र असून शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. महाराष्ट्रातील हे सरकार पाच वर्ष टीकेल. कारण या सरकारला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं अनंत गीते यांनी रायगडमध्ये बोलताना म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांच्या वक्तव्याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही. ते त्यांचं वयक्तिक वक्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, गीते यांनी पुढे म्हटलं होतं की, शिवसेना आणि काँग्रेस हे कधीच एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता याला पुढे काय वळण येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

FD धारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 3 बॅंकांनी बदलले एफडीचे व्याजदर

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

…अन् रिमझिम पावसामुळे इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More