बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, नारायण राणेंचा शिवसेनेला सवाल

मुंबई | शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. संजय राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. त्यातच आता भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?, असा सवाल करत नारायण राणे यांनी काळा पैसा मिळवायचा आणि कारवाई झाली की बोंबलायचं. त्यानंतर केलेली पाप झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा?, असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे.

संजय राऊत यांचं लक्ष मुख्यमंत्रीपदावर आहे की, पक्षप्रमुखपदावर?, असा खोचक सवाल नारायण राणेंनी केला आहे.तसेच संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं होय, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजपच्या लोकांकडून झाला आहे. राष्ट्रभक्तीच्या नावावर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) भ्रष्टाचार केला आहे. आमच्यावर जे हल्ले सुरू आहेत, भाजपने स्वत:च स्वत:ची कबर खोदून घेतली आहे. तुमची कबर तुम्हीचं खोदली आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का? – संजय राऊत

संजय राऊतांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले…

“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”

रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…

“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More