बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सोनिया गांधी सामनाची दखल घेतात’; संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

मुंबई | संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खटके पडायला सुरूवात झाली आहे. नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युतर दिलं आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा सामनाने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला, असं देखील संजय राऊत म्हणाले.

आज राहुल गांधींचा लढा हा एकाकी आहे. राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड घाणेरड्या शब्दांत टीका होत असतानाही ते त्यांच्या मुद्द्याला धरुन राहतात. कोरोना काळात राहुल गांधींनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन सरकारने टीकेची झोड उठवली, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून राहूल गांधी यांची स्तुती केली आहे.

दरम्यान,  देशभरातील सर्वच विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात आले पाहिजे. सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडले पाहिजे, असा सल्लादेखील या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या ‘या’ जिल्ह्याच्या पॅटर्नची चर्चा संपुर्ण राज्यभरात सुरू

‘अजितदादा मराठ्यांचा घात करू नका’; मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

‘या’ शहरात पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपाचा साठा चक्क एका दिवसात पुर्णपणे संपला

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मृत होणाऱ्यांची संख्याही वाढली

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More