बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, म्हणाले…

मुंबई | आज शिवसेनेची पत्रकार परिषद पार पडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून सगळ्यांच्या नजरा तिकडे लागल्या आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेना काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्रकार परिषदेच्या पहिलेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, मी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कधीतरी शिवसेनेचीही पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषद घेण्याच्या पहिलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय.

आज होणाऱ्या परिषदेत विरोधी पक्षावर चांगलाच निशाणा साधला जाणार आहे. मविआ नेत्यांवर भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपच्या याच आरोपांना आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.

दरम्यान, संजय राऊत आज कोणत्या साडे तीन आमदारांविषयी खुलासे करणार आहेत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी सकाळीच शिवसेना भवनातील फोटो पोस्ट करत जय म्हाराष्ट्र असं कॅप्शन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, उद्या शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र बोलणार”

बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, तर पंकजा मुंडे ठरल्या ‘किंग’

“मुलांच्या मनात एकमेकांच्या द्वेषाच विष पसरवू नये, भेदाभेद करणारे…”

‘जेवणापेक्षा Sex आवश्यक’; समंथाच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ

‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणत मनसेजी बॅनरबाजी, सोशल मीडियावर एकच चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More