मुंबई | विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षांवरच निशाणा साधला आहे.
सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.
प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष, त्यांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, अशा शब्दात राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारी कमालीचे बेफिकीर आहेत. सरकारच्या या बेफिकिरीचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. लोकशाहीचे सध्या जे अधःपतन सुरू आहे त्यास भारतीय जनता पक्ष किंवा मोदी-शहांचे एककल्ली सरकार जबाबदार नसून निपचित पडलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे, अशी भूमिका राऊतांनी अग्रलेखातून मांडली आहे.
थोडक्यात बातम्या-
“राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत”
ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा
…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार
मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे
मनसेच्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार