बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) रविवारी पत्राचाळ घोटाळणाप्रकरणी ईडीकडून(ED) चौकशी होऊन अटक करण्यात आले. चौकशी दरम्यान 11 लाखांची रक्कम आणि राऊतांच्या मालमत्तेची काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. यावरून राऊतांना न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊतांची एकूण संपत्ती किती ?, असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

गेल्या काही दिवसांपूर्वी  राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना राऊतांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यानुसार राऊतांच्या आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत(Varsha Raut) या दोघांच्या नावावर संपत्ती आहे. संजय राऊतांच्या नावावर एकूण 8 कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे, तर वर्षा राऊतांच्या नावावर 7 कोटी 27 लाख स्थावर मालमत्ता आहे.

स्थावर मालमत्ता सोडून राऊतांची 2 कोटी 21 लाख इतकी संपत्ती आहे, तर वर्षा राऊत यांची 96 लाख 79 हजार रूपयांची संपत्ती आहे. या राऊत दांपत्यावर काही कर्ज देखील आहे. राऊतांवर 1 कोटी 71 लाख आणि वर्षा राऊत यांच्या नावावर 1 कोटी 67 लाख कर्ज आहे.

दरम्यान, संजय राऊतांची करिअरची सुरूवात ही पत्रकरारितेपासून झाली. सुरूवातीला राऊत हे लोकप्रभा या सप्ताहिकात क्राईम रिपोर्टर(Crime Reporter) म्हणूम काम पहायचे. तेथे त्यांनी अनेक सनासनाटी बातम्या केल्या. त्यावेळी राऊतांच्या लेखातील मत हे शिवसेनेशी मिळते जुळते आहे असं बाळासाहेब ठाकरेंना(Balasaheb Thackray) वाटलं. त्यानंतर 1993 ला संजय राऊतांना सामना(Samana) च्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन यांचं मोठ वक्तव्य, म्हणाल्या…

‘कोण आदित्य ठाकरे?’, एकेरी उल्लेख करत बंडखोर आमदाराची आदित्य ठाकरेंवर टीका

‘फोन लावण्यासाठी मी पायलटला विमान थांबवायला सांगितलं’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो किस्सा

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला?, चार याचिकांवर सुनावणी होणार

‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More