बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडी चौकशीवरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी या पूर्वी 10 तास ईडी(ED) चौकशी झाली आहे. काल ईडीने संजय राऊत  यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु संजय राऊत काल गैरहजर राहिले. यावर संजय राऊत म्हणाले की, सध्या मी संसदेेत आहे. त्यामुळे मी वेळ मागून घेतला आहे. मी कुठल्याही कायदेशीर कारवाईला समोर जायला तयार आहे.

जर माझ्यामुळे शिवसेनेला बळ मिळणार असेल तर मी जेलमध्येही जायला तयार आहे. माझ्याही आधी अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. माझ्या सारख्या अनेकांना ईडीला अटक करायची आहे. जर संजय राऊत बाहेर राहिले तर भाजपला अडचण होईल, मग निवडणुक लढवणे अवघड होईल. यासाठी जर माझ्यावर कारवाई होणार असेल तर  मी तयार आहे. मी कोणत्याही कायदेशीर कारवाईला विरोध करत नाही. मी सध्या संसदेत असल्याने मी वेळ मागून घेतला आहे, असेही राऊत म्हणाले

ईडीच्या अधिकारांचा वापर हा विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यासाठी होत आहे. ईडीचा अधिकार हा जर कोणी भ्रष्टाचार मार्गाने पैसे कमवत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आहे. सत्ताधारी पक्षातील काय धुतलेल्या तांदळाचे आहेत काय ? असा सवालही संजय राऊत यांनी ईडी चौकशी बाबत बोलताना उपस्थित केला.

भाजपला (BJP) शिवसेना फोडायची होती, महाराष्ट्राला, मराठी माणसाला दुबळ करायचं होतं त्यात भाजपला यश आलं पण ते फार काळ टिकणार नाही. शिवसेना निवडणूक लढवणार आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर आम्हाला आश्चर्य़ वाटणार नाही, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर मला खात्री आहे की, कोणत्याही परिस्थित न्यायालयात न्यायमूर्ती संविधाना विरोधात निर्णय देणार नाहीत, असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘तू मला या जगातच का आणलंस?’; अभ्यासाला बस म्हणताच चिमुकला आईवर भडकला

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका!

“बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलात म्हणून काय तुम्ही राजा झालात का?”

एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे नवरा विकी कौशलवर भडकली कतरिना कैफ!

शिवसेनेच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More