“निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत सभा घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या सभेदरम्यान फडणवीसांनी शिवसेनवर तर राज ठाकरेंनी शरद पवारांवर सडकून टीका केली.
राज्यातील वातावरण तापलं असताना आता शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेरोशायरी करत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. तर राऊतांनी या ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील टॅग केलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर संजय राऊतांनी हे ट्विट केलं आहे. राज ठाकरे व फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून राष्ट्रवादी व शिवसेनेवर टीका केल्याने संजय राऊतांनी ट्विट करत त्यावरून निशाणा साधला आहे.
निकले हैं वो लोग हमारी शख्शियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं.@CMOMaharashtra @PawarSpeaks
@— Sanjay Raut (@rautsanjay61) May 3, 2022
थोडक्यात बातम्या-
“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
‘मग ते भोंगेही उतरवा तरच तुम्ही हिमतीचे’, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना, म्हणाले…
Comments are closed.