बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही…

मुंबई | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या नव्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच गाजलं. रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यात संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न. सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांचे व जेष्ठ नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याचा आरोप रश्मी ठाकरेंवर करण्यात आला होता. त्यानंतर गोव्यातही फोन टॅपिंग होत असल्याने गोव्यातील रश्मी शुक्ला कोण, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“हाताची घडी तोंडावर बोट याचं मोठं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे”

पुणेकरांनो सावधान, गेल्या 24 तासांतील ओमिक्रॉन रूग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर

“सरकार जेवायला बोलवतं आणि ताटात काहीच नसतं”

शेन वॉर्नने स्वत:ला दिला होता जुलैपर्यंतचा वेळ, शेवटच्या पोस्टची होतेय चर्चा

ऊर्जामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; स्वा. शेतकरी संघटना आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More