मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. भाजप नेते किरीट सोमय्या विरूद्ध संजय राऊत वाद रंगत असताना यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ‘बाप बेटे जेल मधे जाणार’, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत आलं आहे.
‘मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या दोघांकडूनही आरोपांच्या फैरी झाडणं सुरू आहे. त्यामुळे राऊत विरूद्ध सोमय्या वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है,
कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है… pic.twitter.com/l3yarbD78R— Sanjay Raut (@rautsanjay61) February 17, 2022
थोडक्यात बातम्या-
ना परिक्षा ना मुलाखत, पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ‘इतका’ पगार
…अन् भाजप नगरसेवकाने लावले अजित दादांच्या आभाराचे बॅनर्स
‘आता यापेक्षा जास्त बोलायचं नाही, बस झालं’, राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘नाटकातली घोडी अन् नौटंकी थाट’; आढळरावांचा अमोल कोल्हेंना टोला
“होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे, 2024 च्या निवडणुकीनंतर…”
Comments are closed.