बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

नवी दिल्ली | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यविरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुन्हा दाखल केला होता. एका मुलाखतीदरम्यान राऊतांनी भाजप कार्यकर्त्याविरोधात अपशब्द वापरले असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दिल्ली पोलीसांनी तक्रार दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्ली पोलीसांना खुलं आव्हान दिलं आहे. मी महिलांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही तरी दिल्ली पोलीसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘मी दिल्लीतच आहे. माध्यावर कारवाई करावी’, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिल्ली पोलीसांना दिलं आहे. तर दिल्लीतही शिवसेना आहेच. याचाही विचार करावा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. (Sanjay Raut’s Open Challenge To Delhi Police)

दरम्यान, संजय राऊत यांनी केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच नाही तर कार्यकर्त्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले आणि याआधारावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचं भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

आज इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More