‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई | काही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करत दगडफेक व चप्पलफेक केली. शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या हिंसाचारावर आता सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. (ST Employee Strike)
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसह आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलं. शरद पवारांच्या घराबाहेरील हिंसक आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही. तुम्ही सुद्धा आरशाच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर मोर्चा घेऊन येणार असल्याचं मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कसं लक्षात आलं नाही, असा प्रश्न राज्यात उपस्थित केला जात आहे. तर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तब्बल 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
थोडक्यात बातम्या-
कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा
“कर्म याच जन्मात फेडावे लागतात, यातून कोणीच वाचत नाही”
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांचा झटका
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा उच्चांक, वाचा ताजे दर
शरद पवारांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
Comments are closed.