बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बूस्टर डोस नाही पण आमचा प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकापाठोपाठ एक सभा घेत राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरेंपाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील आज जाहीर सभा घेत आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला आहे.

काही लोक राज्य बिघडवण्याचा, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे आणि यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं राऊत म्हणाले. तर बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील, देशातील वातावरण, वातावरणात आलेलं मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल, असा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धवजी, हिंमत करा आणि टोमण्या पलीकडची कृती आज कराच”

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले

मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, शरद पवारांवरील टीका अंगलट

‘हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने मारून…’; पवारांवरील आक्षेपार्ह टीकेनंतर रूपाली ठोंबरे आक्रमक

‘तू तर लबाडांचा लबाड…’; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर टीका, वादग्रस्त पोस्ट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More