मुंबई | ‘फासा आम्हीच पलटणार, तोही शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल’, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांना माझ्या शुभेच्छा , असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. माध्यमांशी संजय राऊत बोलत होते.
काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर सामन्यातून टीका केलेली नाही, तर त्यांच कौतुक केलंय असं संजय राऊतांनी सांगितलं. तसंच काँग्रेस पक्ष देशात सत्तेत नसला तरी महत्वाचा राजकीय पक्ष असल्याचही राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधीपक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका
‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर
…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”
‘अक्षयने लग्नाचं वचन देत मला…’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप
महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान