महाराष्ट्राच्या बाहेर शिवेसनेच्या ‘फ्लाॅप शो’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई | देशात आज विधानसभा निवडणूक 2022 चा आवाज घुमत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांकडे लागून आहे. शिवसेनेनं आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्राबाहेरही करण्याचा निर्णय घेतला असून सध्या महाराष्ट्राबाहेर त्यांचा फ्लाॅप शो दिसत असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
गोव्यात आणि उत्तर प्रदेशात शिवेनेचा फ्लाॅप शो दिसत असून शिवसेनेवर टीकास्त्र डागलं जात आहे. शिवसेनेच्या फ्लाॅप शोची चर्चा रंगली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही. आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे. आता अजून चित्र स्पष्ट व्हायला 2 वाजतील. बघू काय होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सध्या पोस्टल मतमोजणी झाली, अद्याप इतर मतमोजणी बाकी आहे आताच कुठे मतमोजणीला सुरवात झालीय. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात 5 वाजेपर्यंत स्पष्ट चित्र कळेल, असंही राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”
Goa Election Result 2022: मनोहर पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला जोर का झटका
Up Election Result 2022: पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लाॅप शो
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा
“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.