मुंबई | माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत विधानसभा हदरवून सोडली. फडणवीसांनी पुराव्यांसह केलेल्या आरोपांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
125 तासांच्या स्टिंगमधील काही महत्त्वाचे भाग देवेंद्र फडणवीसांनी 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हमार्फत सादर केले. देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सनसनाटी निर्माण करणारे आरोप केले. यामागे कोण आहे. हे स्क्रिप्ट कोणी लिहिलं आहे. भाजपचे सलीम जावेद कोण?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तर यातील पात्र कोण?, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, खोट्या कारवाया कशा कराव्यात, राजकीय नेत्यांना कसं अडकवावं, खोटे पुरावे कसे सादर करावेत, हे सध्या केंद्रीय यंत्रणांचं काम सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागले, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आणि गाराही पडणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मोठी बातमी! रशियाची ‘ही’ अट युक्रेनला मान्य
…तर योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, अनेक विक्रम मोडतील
Comments are closed.