बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सव्वा रुपया असो किंवा सव्वा कोटी मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. यावर राऊत माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये सापडलेल्या 21 हजार कोटींच्या ड्रग्सवरुनही संजय राऊतांनी निशाणा साधला. 21 हजार कोटींचं ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हाला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘2027 ला मानवजात नष्ट होणार?’; ‘या’ व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

“राहुल आणि प्रियंका गांधी अनुभवहीन आणि दिशाभूल झालेेले नेते”

”दरेकर काही चुकीचं बोलले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय”

‘या’ कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; भारतातील फ्रेशर्ससाठी भरतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विमानाने अमेरिकेला गेले, त्या विमानाची किंमत तब्बल ‘इतके’ हजार कोटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More