“आम्हाला पाकिस्तान घ्यायचाय, त्यांना जमलं नाही ते आम्ही करू”

जम्मू | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) हे सध्या जम्मू दोऱ्यावर आहेत. जम्मूत दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

जम्मूमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांचे अनेक कार्यक्रम होणार आहेत. तसेच ते तेथिल काश्मिरी विस्थापित पंडितांना देखील भेटणार आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बाळासाहेबांचे विचार कुठपर्यंत पोहोचले आहेत हे दिसतं, असं संजय राऊत म्हणालेत.

शिंदे गटाचे काही मंत्री असं म्हणतात की, संजय राऊत हे जम्मूत आले आहेत. आता संजय राऊत यांनी पुढं पाकिस्तानात जावं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हो आम्हाला पाकिस्तान घ्यायचाच आहे. त्यांना जमलं नाही, ते आम्ही नक्की करू, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, कार्यक्रम कशाचा आहे, असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, पाकिस्तान ताब्यात घेण्याविषयी ते बोलत असतील, तर तोच कार्यक्रम असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-