मुंबई | भाजपचे (BJP) नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) 17 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नसल्यानं संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्याचं सरकार हे अलोकशाही पद्धतीने सत्तेत आले आहे. आम्ही त्यांना त्याच मार्गाने खालू खेचू, असं राऊत म्हणालेत.
आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेचा आहे. या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही ठरेल, असं राऊत म्हणालेत.
लोकशाी मार्गाने आंदोलन करण्यास बंदी आहे का? जर बंदी असेल तर सरकारने तसं जाहीर करावं. मोर्चाला परवानगी नाकारल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील, असा इशाराही राऊतांनी सरकारला दिला.
महत्त्वाच्या बातम्या-